पर्यटन व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी एकसंघ होऊन समन्वयातून काम करुया- बाबा मोंडकर.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झालेला आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वृध्दिंगत करायचा असेल तर आपण सर्वांनी एकसंघ होऊन समन्वयातून काम करुया असे प्रतिपादन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी वेंगुर्ले पर्यटन व्यवसायिकांच्या बैठकीत केले.
वेंगुर्ले साईमंगल कार्यालय येथे पर्यटन व्यावसायिकांची बैठक आयोजित केली होती. पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांचे स्वागत वेंगुर्ल नगराध्यक्ष राजन गिरप यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ल पर्यटन महासंघाचे अध्यक्ष महेश सामंत तसेच बहुसंख्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)