ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कोकण रेल्वे प्रवासी वर्गासाठी खुषख़बर…!

कोकण रेल्वे प्रवासी वर्गासाठी खुषख़बर…!

प्रकाशन: 13 Sep 2022 09:55 AM
वाचन संख्या 263

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : यंदाच्या पावसाळ्याच्या उत्तरार्धामध्ये कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण ठरलेल्या वेळेपेक्षा सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे विद्युतीकरण पूर्ण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली होती. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावरून १५ सप्टेंबरपासून प्रवासी रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर चालविल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याच्या कोकण रेल्वेच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार येत्या १५ सप्टेंबरपासून ‘दादर सावंतवाडी तुतारी’ तसेच ‘मंगला एक्सप्रेस’ विद्युत इंजिनसह धावणार आहेत. त्यापाठोपाठ ‘मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस तसेच दिवा – सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस या प्रवासी गाड्या दिनांक २० सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.’ मडगांव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी देखील १५ सप्टेंबरपासून विजेवरील इंजिनावर धावणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत.

विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या आणि एक प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या या विद्युतीकरणाला सहा महिने होऊनही सध्या डिझेल इंजिनवर धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या सबस्टेशनची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले होते. मात्र आता या कामातील रत्नागिरी येथील टी.एस.एस. ( ट्रॅक्शन सबस्टेशन ) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. यामुळे कोकण रेल्वेने येत्या १५ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेच्या इंजिनासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मार्गावरून जाणारी ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ येत्या १५ ऑक्टोबरपासून तर ‘मुंबई – मेंगलोर एक्सप्रेस’ १ जानेवारी २०२३ पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वे माहिती दिली आहे. मुंबई सीएसटी ते करमाळी दरम्यान धावणारी ‘तेजस एक्सप्रेस’ १५ ऑक्टोबर २०२२ पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. याचबरोबर उर्वरित गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स