ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत.

विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत.

प्रकाशन: 12 Sep 2022 08:03 PM
वाचन संख्या 253

नवलराज काळे | वैभववाडी : विजेचा धक्का बसून उंबर्डे-मेहबूबनगर येथील १५ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरी घडली. शाहीदरजा नियात फरास (१५)असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शाहीद फरास हा रविवारी सायंकाळी येथील मशिदीत नमाज पडून जवळच असलेल्या मामाच्या घरी काही कामानिमित्त गेला होता. यावेळी मामाच्या घरातील लाईट लावण्यासाठी लोखंडी जिण्यावर चढला, लाईटचे बटन चालू करताना त्याला जोरदार वीजेचा धक्का बसला. तो जिन्यावरून खाली कोसळला. त्याला तातडीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढे हलविण्यास सांगितले. नातेवाईकांनी त्याला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान रात्री १२.३० वा. सुमारास त्याचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इयत्ता नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाच्या मृत्यूने उंबर्डे गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स