ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ओरोसला टेम्पो ट्रॅव्हलर पलटून जबर अपघात ; चालकाचा मृत्यू.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओरोसला टेम्पो ट्रॅव्हलर पलटून जबर अपघात ; चालकाचा मृत्यू.

प्रकाशन: 12 Sep 2022 06:25 PM
वाचन संख्या 796

ओरोस | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे आज दुपारी एक भीषण अपघात घडला.
श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा ताफा कणकवली येथून कुडाळच्या दिशेने जात असताना ओरोस (सावंतवाडा भवानी मंदिर) येथे आला असता त्यातील टेम्पो ट्रॅव्हलर पलटून जबर अपघात झाला.
आज दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी झालेल्या या अपघातात चालक नरसिंहमूर्ती श्रीनिवास राव (४३ वर्ष) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्यानंतर स्वतः श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी तेथे थांबून होते. पूर्ण ताफाच त्यांचा थांबलेला होता.


कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जात असताना कणकवली चातुर्मास मासानिमित्त आलेल्या वामन आश्रम स्वामीच्या गाडींच्या ताफ्यातील ए ए ४७ एम ३६२५ या टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी रस्त्यावर पलटी झाली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरीकेट्सला ही गाडी आपटली.

यावेळी या मार्गाने प्रवास करणारे बापर्डे गावचे सरपंच संजय लाड, सामाजिक कार्यकर्ते जीवन नाईकधुरे, दुसनकर व लक्ष्मण परब यांनी इतर लोकांच्या मदतीने गाडीखाली सापडलेल्या डायव्हरला बाहेर काढले. त्यानंतर जखमी तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील चालक नरसिंहमूर्ती यांचे उपचारास दरम्यान निधन झाले. तर उदय नायल कुंदापुर उडपी आणि प्रज्वल शेठ तिर्थवाडी कर्नाटक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.

फोटो | ओरोस ( सिंधुदुर्ग नगरी) ब्युरो सौजन्य.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स