ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय,राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघ सिंधुदुर्ग कडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

राष्ट्रीय,राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघ सिंधुदुर्ग कडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

प्रकाशन: 11 Sep 2022 04:46 PM
वाचन संख्या 74

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
राष्ट्रीय,राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षकसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कार प्राप्त लढा मंच तर्फे शिक्षणमंत्री श्री.दीपक केसरकर यांची भेट घेऊन निवेदन देऊन विविध प्रलंबित प्रश्नांविषयी व जिल्हापुरस्कार वेतनवाढ प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली.
या भेटीचे नियोजन श्री.महेश पालव ,श्री विठ्ठल कदम व श्री.भरत गावडे सर यांनी केले होते.यावेळी शिक्षण मंत्री श्री.दीपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज सावंत यांनी स्वागत केले.या भेटीवेळी राज्यमुख्यसंघटक श्री.पांडुरंग काकतकर,जिल्हा मुख्यसंघटक श्री.विठ्ठल कदम ,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.उदय गोसावी ,श्री.बाबाजी झेंडे ,श्री.दत्तगुरु कांबळी ,श्री.महेश पालव ,श्री.प्रमोद पावसकर आदी शिक्षक उपस्थित होते.
या भेटीवेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स