ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे…!

शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे…!

प्रकाशन: 11 Sep 2022 04:36 PM
वाचन संख्या 57

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांची माहिती.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कोराना साथीमुळे बराच काळ घरी राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक आणि शारीरिक विकास मंदावलेला निदर्शनास येत आहे.कोरोनासाथीमुळे अनेक निर्बंध उठले, सध्या राज्यात सर्व काही खुले झाले असून प्रतिवर्षी होणा-या शालेय क्रीडा स्पर्धा सुरु करण्यासाठी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने कंबर कसली असून विद्यार्थ्यांचे, खेळाडूंचे हित लक्षात घेऊन या शालेय क्रीडा स्पर्धा तात्काळ सुरू करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे.

आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचा हंगाम यंदा सुरू होणार याची चर्चा होत असताना पुन्हा एकदा स्पर्धा होणार की, नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी खेळाडूंचे हित समोर ठेवून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत स्पर्धा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी विनंती केली आहे.

दरवर्षी १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील आंतर शालेय क्रीडा स्पर्धा तालुका ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत होत असतात. मात्र, कोरोना १९च्या प्रादुर्भावामुळे सलग तीन वर्षांपासून बंद आहेत.सध्या सर्व काही सुरळीत सुरू मात्र,संबधित शासन निर्णयामुळे शालेय क्रीडा स्पर्धेवरील बंदी उठलेली नाही. विद्यार्थ्याच्या कौशल्याचा विकास होण्यासाठी या स्पर्धा पुन्हा चालू कराव्यात असे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.शालेय क्रीडा स्पर्धेत नेहरू हॉकी व सुब्रोतो कप स्पर्धासह एकूण ९३ खेळांच्या स्पधांचे आयोजन केले जाते. शालेय स्पर्धेतील ९१ खेळांपैकी ४९ खेळांना आयोजनासाठी अनुदान मिळते तर ४२ क्रीडा प्रकारांच्या खेळांचे आयोजन संबंधित एकविध खेळ संघटनांद्वारे केले आले आहे. सदर स्पर्धा आयोजना करीता रुपये १३००,०० लक्ष इतका नियतव्यय निधी उपलब्ध असून या निधीतून स्पर्धाचे आयोजन केले जाऊ शकते असे क्रीडा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी क्रीयुसे/शाक्रीस्प/आयोजन / २०२२- २३/कार्या.४/२७३८ दिनांक २८ जून २०२२ च्या पत्राने शासनास परवानगीसाठी पाठविले आहे. मात्र, आजतागायत निर्णय प्रलंबित आहे, असे राजेंद्र कोतकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. मागील तीन वर्षांपासून शालेय स्पर्धा बंद असल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्याथ्यांचे पहिलेच खूप मोठे नुकसान झाले आहे. या वर्षीही स्पर्धा जर झाल्या नाही तर खेळाडूंची पाच- सहा वर्षांची मेहनत वाया जाणार आहे अशी चिंताही या निवेदनातून व्यक्त केली आहे. एक वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचा गट बदलून वयाने मोठ्या असणाऱ्या खेळाडूंशी मुकाबला करावा लागतो. त्यामुळे परफॉर्मन्स बदलल्याने मोठे नुकसान होते.तसेच या वर्षी स्पर्धा न झाल्यास दहावी व बारावीत मिळणारे ग्रेस गुण, अकरावी प्रवेश कोटा, नोकरीतील ५ टक्के आरक्षण मिळणार नाही, या महत्वाच्या विषयांकडेही श्री. कोतकर यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धा या ऑलिम्पिक स्पर्धेचा पाया असल्याने त्याच स्पर्धा जर सलग दोन तीन वर्ष जर झाल्या नाही तर खेळाडूंमध्ये नैराश्य येऊन, भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, ऑलिम्पिकवीर या व्यवस्थेतून बाहेर पडून क्रीडा क्षेत्राचे पर्यायाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे.मोबाईलच्या मायाजालातून सध्या मैदानावर महत प्रयासाने आलेले हे खेळाडू मैदानापासून दुरावण्याची भीतीही त्यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.


फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेतील दोन गटातील वादामुळे राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन अधांतरी असले तरी महाराष्ट्रातील लक्षावधी खेळाडूंच्या हिताचा व भविष्याचा विचार करून शालेय क्रीडा स्पर्धांना किमान राज्यस्तरापर्यंत तरी परवानगी मिळून शालेय क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पाठविलेल्या निवेदनात विनंती केली आहे.
‘गोविंदा’ सारख्या सांस्कृतिक धाडशी कसरतीला आपण  खेळ दर्जा देऊन ५ टक्के आरक्षणही जाहीर केले. मात्र शालेय स्पर्धेची एखाद्या चातकासारखी वाट पाहण-या महाराष्ट्रातील लक्षावधी खेळाडूंच्या भविष्याचा विचार होताना दिसत नाही.
मात्र जर महाराष्ट्रात शालेय स्पर्धेचा कार्यक्रम सुरू झाला नाही तर अशा परिस्थितीत खेळाडूने काही चुकीचे पाऊल उचलून जीवाचे बरे वाईट केल्यास यास शासनच जबाबदार असेल असेही त्यांनी नमूद केले आहे.
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने आतापर्यंत शालेय क्रीडामंत्री,राज्याचे क्रीडा आयुक्त, क्रीडा संचालनालय पुणे, विविध भागातील आमदार यांच्यासह अनेकांना प्रस्ताव, निवेदनाद्वारे शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला असून तरीही अद्यापपर्यंत कोणताच ठोस निर्णय न झाल्याने.. अखेर थेट मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्यासाठी साकडे घालावे लागले अशी प्रतिक्रिया राजेंद्र कोतकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स