मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल (ओरोस) येथे ३ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झालेल्या, 'क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग' आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात ७१ किलो वजनी गटात 'स. का. पाटील संलग्न' रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील कु. साहिल नागनाथ लंगोटे याने प्रथम क्रमांक पटकावला. कु. साहिल लंगोटे हा इयत्ता १२ वी कला शाखेचा विद्यार्थी आहे. त्याची विभाग स्तरासाठी त्याची निवड झाली आहे.
कु. साहिल लंगोटे याला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मिथिलेश रविंद्र खराडे यांचे मार्गदर्शन आणि आर्यन सुर्वे यांचे सहकार्य लाभले.
कु. साहिल लंगोटे याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर अशा मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)