ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कालपासून 'म्हाळ' सुरु..!

कालपासून 'म्हाळ' सुरु..!

प्रकाशन: 11 Sep 2022 04:10 PM
वाचन संख्या 113

पितृपंधरवडा तथा महालय म्हणजे कोकणवासियांनी पूर्वजांचे तथा पितरांचे केलेले ‘सश्रद्ध पुण्यस्मरण.’

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : गणेशोत्सवाला आलेले काही चाकरमानी आता खास म्हाळासाठी थांबले आहेत. कारण कालपासूनच पितृपंधरवडा (महालय) सुरू झाला. मालवणी भाषेत याला ‘म्हाळ’ असेही बोलले जाते.
या १५ दिवसात गावात कुठे ना कुठे तरी घरात म्हाळाचे (श्राद्ध) जेवण असते. श्राद्ध म्हणजे श्रध्देने केले जाणारे पितरांचे स्मरण. पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून या पितृपंधरवद्यात घरात श्राद्ध घातले जाते.ब्राह्मणना बोलऊन विधिवत पिंडदान करून पितरांच्या नावाने जेवणकरी ठेवतात आणि सर्वांना अन्नदान केले जाते. पितृपक्षात पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून या १५ दिवसात पूर्वजांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्धविधी केले जातात. पितरांच्या नावाने पिंडदान, अन्नदान केले जाते. यावेळी जेवणात खूप सारे पदार्थ असतात. वरण – भात, वाटण्याची उसळ, खीर, भोपळ्याची भाजी, बटाट्याची भाजी, सोलकडी, वडे संभारे, भजी असे मिष्टान्न असते. या म्हाळाच्या जेवणाला अगत्यपूर्व गावातील सर्वांना, सगे- सोयरे, नातेवाईक, मित्रांना बोलवले जाते. यावेळी खास करून पितरांच्या नावाने ‘जेवणकारी’ म्हणजेच निमंत्रीत भोजनग्रही ठेवले जातात. त्यानंतर रात्रौ गावातील भजनही ठेवले जाते.

पितृपक्षातील पंधरवडा हा भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतीपदे पर्यंत असतो आणि सर्वपित्री अमावस्येला संपतो. ज्या पितरांचा मृत्युदिन नक्की माहित नसतो त्या सर्व पितरांचे श्राद्ध हे ‘सर्वपित्री अमावस्येला’ करतात. कोरोना काळात कुणी कुणाकडे जात नहोते. मात्र यंदा हे विधी उत्कट भक्तिभावाने आणि श्रध्देने सर्वत्र होणार आजच्या डिजिटल, युगातही ही परंपरा कोकणात तेव्हढीच श्रध्देने सुरू आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स