साळशी -सरमळे वाडी जोडरस्ता सौरपथदीपने झळाळला ; महाराष्ट्र नवनिर्माण ' लाॅटरी सेनेचा ' उपक्रम.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी-सरमळे वाडी जोडरस्ता येथे महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेच्या वतीने बसवण्यात आलेल्या सौर पथदीपाचे लोकार्पण सुखशांती मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पवार यांच्या माध्यमातून साळशी सरमळे वाडी जोड रस्त्या येथे सौर पथदीप बसविण्यात आला आहे या ठिकाणी सौरदीप बसविण्यात यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे.
या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी सुख शांती मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम सचिव राजेद्र साटम महाराष्ट्र नवनिर्माण देवगडचे उप तालुकाप्रमुख रुपेश पांगम नाद विभागीय अध्यक्ष बाळकृष्ण गुरव शशिकांत लाडगावकर यशवंत लाडगावकर सुरेश कदम रवींद्र रावले प्रकाश रावले सुनील रावले शांताराम रावले साईराम लाड सुनील लाड विनायक रावले किरण कदम गणेश पवार विनोद पवार निलेश पवार आनंद पवार आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सचिव राजेंद्र साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पवार यांनी सौरपथ दीप उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)