ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उत्कर्ष मंडळ मुंबई कडून विलवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..!

उत्कर्ष मंडळ मुंबई कडून विलवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..!

प्रकाशन: 08 Sep 2022 05:29 PM
वाचन संख्या 53

बांदा | राकेश परब :
उत्कर्ष मंडळ मुंबई(टेंबवाडी) आयोजित विलवडे नं.२ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीची औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये वह्या,स्कूल बॅग,कंपास, वॉटरबॅग, पेनड्राईव्ह शाळेला संगणक संच,साउंडसिस्टिम आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी उपसभापती कृष्णा सावंत तर बांदा केंद्र प्रमुख संदीप गवस, मंडळाचे अध्यक्ष अरुण सावंत यांच्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा सावंत यांनी उत्कर्ष मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रतिक सावंत व प्रणव दळवी यांचा विशेष गौरव करण्यात आला .यावेळी केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत,उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी, मोहन सावंत माजी उपसरपंच प्रकाश दळवी,लक्ष्मीकांत सावंत,देवानंद सावंत,आशिका सावंत,लक्ष्मण सावंत,पूर्वा दळवी,मानसी सावंत,समीक्षा सावंत, विश्वास सावंत,सुभाष कानसे,भालचंद्र गवस,महेंद्र सावंत,धनश्री सावंत ,माधुरी सावंत, संजय सावंत,समिधा सावंत व उत्कर्ष मंडळाचे सर्व सदस्य, सीमा दळवी, मनाली दळवी व लांबर गुरुजी,शाळेचे सर्व आजी माजी विद्यार्थी,सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश काळे तर आभार सचिन शेळके यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स