ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बापर्डे ग्रामपंचायतीकडून घरोघरी जावून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची 'ई केवायसी'..!

बापर्डे ग्रामपंचायतीकडून घरोघरी जावून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची 'ई केवायसी'..!

प्रकाशन: 08 Sep 2022 07:00 PM
वाचन संख्या 48

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यामधील पीएम किसान योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने बहुतांश लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार होते. बापर्डे ग्रामपंचायतीने बापर्डे गावामधील पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी घरोघरी जावून पुर्ण केली आहे. यामुळे बापर्डे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यातील पीएम किसान योजनेतील 6112 लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेची ई-केवायसी केली नव्हती यामुळे या योजनेचा अनुदानाचा 12 वा हप्ता मिळण्यापासून लाभार्थ्यांना वंचित रहावे लागणार होते. 1 सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत ई केवायसी नोंद करणे संदर्भात सूचना शासन स्तरावरुन आल्या होत्या. बापर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी पुढाकार घेवून गावामधील पीएम किसान योजनेपासून कोणतीही व्यक्ती वंचीत राहू नये म्हणून आपले सरकार सेवा केद्राचे केंद्रचालक सचिन नाईकधुरे व ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्नील तिर्लोटक्र यांनी घरोघरी जावून ई केवायसीची नोंद केली आहे. यामुळे बापर्डे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे. याआधी बापर्डे ग्रामपंचायतीने शासनाच्या आलेल्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करुन अनेक योजना राबविल्या आहेत. स्मार्ट ग्राम, बायोगॅस सनियंत्रण योजना,निर्मल ग्राम अशा विविध योजना राबवून बापर्डे गावाचे नाव उज्वल केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स