ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण नगरपरिषदेमार्फत शहरात 19 ठिकाणी बसवले काॅन्व्हेक्स मिरर..!

मालवण नगरपरिषदेमार्फत शहरात 19 ठिकाणी बसवले काॅन्व्हेक्स मिरर..!

प्रकाशन: 07 Sep 2022 04:29 PM
वाचन संख्या 153

मुख्याधिकारी संतोष जिरगे व प्रशासनाने माजी नगराध्यक्ष व सहकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या मागणीची घेतली दखल.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडे केला होता पाठपुरावा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराच्या विविध भागातील रहदारीच्या व वाहतुकीच्या रस्त्यांपैकी काही धोकादायक वळणांवर काॅन्व्हेक्स मिरर बसविण्याची मागणी सातत्याने होत होती. नगरपालिका प्रशासनाकडून स्थानिक नागरिक व माजी लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेऊन नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी धोकादायक वळणांवर काॅन्व्हेक्स मिरर नगरपरिषद निधी मधुन बसविण्याचे कार्यादेश सबंधित कंत्राटदारास दिले. त्यानुसार शहरात 19 ठिकाणी काॅन्व्हेक्स मिरर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

यासंदर्भात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी समाधान व्यक्त केले आणि सांगितले की मालवण शहर पर्यटन दृष्टीने विकसीत करताना स्थानिक नागरीक,रहदारी व पर्यटक यांची सुरक्षितता महत्वाची आहे हे लक्षात घेऊन असे काॅन्व्हेक्स मिरर बसविण्याची मागणी आपण व सहकारी नगरसेवकांनी केली होती. या संदर्भात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्याशीही चर्चा करुन त्याचा पाठपुरावा केला गेला होता. आता नगरपरिषद प्रशासनाने बसविलेले हे काॅन्व्हेक्स मिरर मालवण शहरातील धोकादायक वळणांवरील छोट्या मोठ्या अपघातांना जास्तीतजास्त आळा घालण्यात यशस्वी ठरतील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स