ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शिरगांव - साळशी रस्त्यावर अपघात..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिरगांव - साळशी रस्त्यावर अपघात..!

प्रकाशन: 07 Sep 2022 04:10 PM
वाचन संख्या 201

क्वालीस आणि एस.टी. मध्ये जोरदार धडक..!

साळशी सरपंच वैभव साळसकर संतप्त..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव – साळशी मार्गावर साळशीच्या दिशेने जाणारी देवगड – रेंबवली एस. टी आणि साळशीहून शिरगांव कडे येणारी टोयाटो क्वालिस यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघाताची तीव्रता एव्हडी भयानक होती की क्वालिस गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन खूप मोठे नुकसान झाले .
हा अपघात हा खांबड जवळ, प्रसाद साटम यांच्या कलम बागे जवळील धोकादायक वळणावर आज बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
या दोन्ही वाहनातील प्रवाशांना किरकोळ दुखापत तर काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे.या सर्वांना शिरगांव येथील राजे गृप, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता कणकवली , कुडाळ येथे पाठविण्यात आले.

देवगड – रेंबवली एस.टी.( चालक – सचिन राणे, वाहक- मंदार मालंडकर, एमएच. १४ बीटी १५७८) ही साळशी कडे जात होती तर साळशीहून टोयाटो क्वालिस (एमएच ०४ बीवाय २५९६) ही शिरगांव कडे जात असताना खांबड नजिक प्रसाद साटम यांच्या कलमांच्या बागे जवळील धोकादायक वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातात क्वालिस गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन फार मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर साळशी येथील पंढरीनाथ लाड यांनी शिरगांव येथील राजे गृप ला कळविले असता. तात्काळ राजे गृप ची रुग्णवाहिका अपघातस्थळी आली. त्यानंतर जखमी प्रवाशांना शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एस. चव्हाण यांनी उपचार करून गंभीर प्रवाशांना राजे गृप, प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि १०८ या रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता कणकवली, कुडाळ येथे पाठविण्यात आले.

जखमी प्रवाशांची नावे अशी – प्रियांका प्रकाश पवार(४२ – तोरसोळे), संजना जगन्नाथ तर्फे ( २० – कुवळे), वैशाली प्रसाद गांवकर (४५- साळशी), आर्या रामदास गांवकर(१४- साळशी), प्रसाद बबन गांवकर(१३- साळशी), वैष्णवी विवेक दळवी(४८- साळशी), राजश्री रामचंद्र परब(५५- गडीताम्हणे), संदेश पांडुरंग घाडी(३८- चाफेड), देवार्य रामदास गांवकर(९- साळशी) हरीश गुरुनाथ मल्हार(९- तळेबाजार) या प्रवाशांना डोक्याला, पायाला दुखापत झाली आहे.

या अपघाताची खबर मिळताच देवगड पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, हवालदार राजन जाधव, शिरगांव पोलीस हवालदार यू. एम. शिरगांवकर,पोलीस नाईक पी.एन. महाडिक, वाहतूक पोलीस विशाल वैजल,पोलीस हवालदार शैलेश म्हेत्रे, होमगार्ड प्रशांत नाटळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी देवगड एस. टी आगर व्यवस्थापक निलेश लाड, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर, आगार लेखाकर श्रीकांत शेळके यांनी सुध्दा घटनास्थळी पंचनामा केला.

यावेळी साळशी सरपंच वैभव साळसकर, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, साळशी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर आदीसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी घाव घेतली.

या अपघातानंतर माध्यमांशी बोलताना बोलताना साळशी सरपंच वैभव साळसकर यांनी, शिरगांव – साळशी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर झाडे झुडुपे वाढल्याने वाहन चालकांना वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही व याबाबत संबधित सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे असे सांगत संताप व्यक्त केला. संबंधीत सर्वांवर आधी गुन्हे दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स