शिरगांव - साळशी रस्त्यावर अपघात..!
क्वालीस आणि एस.टी. मध्ये जोरदार धडक..!
साळशी सरपंच वैभव साळसकर संतप्त..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या – साळशी मार्गावर साळशीच्या दिशेने जाणारी देवगड – रेंबवली एस. टी आणि साळशीहून कडे येणारी टोयाटो क्वालिस यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघाताची तीव्रता एव्हडी भयानक होती की क्वालिस गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन खूप मोठे नुकसान झाले .
हा अपघात हा खांबड जवळ, प्रसाद साटम यांच्या कलम बागे जवळील धोकादायक वळणावर आज बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
या दोन्ही वाहनातील प्रवाशांना किरकोळ दुखापत तर काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे.या सर्वांना येथील राजे गृप, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता कणकवली , कुडाळ येथे पाठविण्यात आले.
देवगड – रेंबवली एस.टी.( चालक – सचिन राणे, वाहक- मंदार मालंडकर, एमएच. १४ बीटी १५७८) ही साळशी कडे जात होती तर साळशीहून टोयाटो क्वालिस (एमएच ०४ बीवाय २५९६) ही कडे जात असताना खांबड नजिक प्रसाद साटम यांच्या कलमांच्या बागे जवळील धोकादायक वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातात क्वालिस गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊन फार मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर साळशी येथील पंढरीनाथ लाड यांनी येथील राजे गृप ला कळविले असता. तात्काळ राजे गृप ची रुग्णवाहिका अपघातस्थळी आली. त्यानंतर जखमी प्रवाशांना शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एस. चव्हाण यांनी उपचार करून गंभीर प्रवाशांना राजे गृप, प्राथमिक आरोग्य केंद्राची आणि १०८ या रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता कणकवली, कुडाळ येथे पाठविण्यात आले.
जखमी प्रवाशांची नावे अशी – प्रियांका प्रकाश पवार(४२ – तोरसोळे), संजना जगन्नाथ तर्फे ( २० – कुवळे), वैशाली प्रसाद गांवकर (४५- साळशी), आर्या रामदास गांवकर(१४- साळशी), प्रसाद बबन गांवकर(१३- साळशी), वैष्णवी विवेक दळवी(४८- साळशी), राजश्री रामचंद्र परब(५५- गडीताम्हणे), संदेश पांडुरंग घाडी(३८- चाफेड), देवार्य रामदास गांवकर(९- साळशी) हरीश गुरुनाथ मल्हार(९- तळेबाजार) या प्रवाशांना डोक्याला, पायाला दुखापत झाली आहे.
या अपघाताची खबर मिळताच देवगड पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, हवालदार राजन जाधव, पोलीस हवालदार यू. एम. कर,पोलीस नाईक पी.एन. महाडिक, वाहतूक पोलीस विशाल वैजल,पोलीस हवालदार शैलेश म्हेत्रे, होमगार्ड प्रशांत नाटळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी देवगड एस. टी आगर व्यवस्थापक निलेश लाड, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर, आगार लेखाकर श्रीकांत शेळके यांनी सुध्दा घटनास्थळी पंचनामा केला.
यावेळी साळशी सरपंच वैभव साळसकर, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, साळशी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर आदीसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी घाव घेतली.
या अपघातानंतर माध्यमांशी बोलताना बोलताना साळशी सरपंच वैभव साळसकर यांनी, – साळशी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर झाडे झुडुपे वाढल्याने वाहन चालकांना वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही व याबाबत संबधित सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे असे सांगत संताप व्यक्त केला. संबंधीत सर्वांवर आधी गुन्हे दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)