ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
यावेळेचा मोरया मॅशअप सोबत..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

यावेळेचा मोरया मॅशअप सोबत..!

प्रकाशन: 05 Sep 2022 07:18 PM
वाचन संख्या 139

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी गणेशोत्सवात श्री. सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते.
यावर्षीदेखील, त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरूपात आपली क्रांतिकारी कला सादर केली आहे. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे.


सस्टेनिबिलिटी, क्रिएटिव्हिटी व नवीन मॅशअप ही ब्रँडची काही महत्वाची मूल्ये आहेत. रिओ बबली फ्रुट ड्रिंक याच मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. पर्यावरण संरक्षणासाठी पूरक असणाऱ्या रिओ बबली फ्रुट ड्रिंक कॅन्सचा वापर करून गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे.
“सस्टेनिबिलिटी हा नेहमीच रिओचा अविभाज्य भाग राहिला आहे. त्यामुळे अल्युमिनियम कॅन्ससारखे पर्यावरणपूरक पॅकेजिंग असावे यावर नेहमीच भर राहिला आहे. यातील प्रत्येक कॅनचा पुनर्वापर करता येईल” असे श्री. राहुल सांगोई, रिओ सीईओ यांनी सांगितले.
“रिओ बबली फ्रुट ड्रिंक मॅशअपच्या कल्पनेशी सुसंगत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आपण विविध कल्पनांचा वापर करून नवीन निर्मिती ही करू शकतो व त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनातही हातभार लावू शकतो. ही गणेश मूर्ती म्हणजे डेकोरेशन साहित्य, कॅन्स, आणि क्रिएटिव्हिटीचा मॅशअपच आहे.” असं सुमित पाटील म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स