साळशी येथील काका साळसकर यांचे निधन
संतोष साळसकर / शिरगांव : देवगड तालुक्यातील साळशी येथील प्रतिष्ठित रहिवाशी गोपाळ उर्फ काका धोंडू साळसकर(५२)यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्याने निधन झाले. ते शिरगाव परिसरात काका या नावाने सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,एक विवाहित बहीण,भावजय,भावोजी,पुतणे-पुतणी असा परिवार आहे.साळशी येथील श्री.पावणाई प्रासादिक भजन मंडळामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा.सर्वांशी ते मिळून मिसळून रहायचे त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.साळशी सरपंच वैभव साळसकर यांचे ते चुलत भाऊ होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)