तारकर्ली येथील बळीराम पुंडलिक कोळंबकर यांचे निधन..!
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील बळीराम पुंडलिक कोळंबकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काल गुरुवार दिनांक १ सप्टेंबरला बळीराम कोळंबकर यांची प्राणज्योत मालवली.
गणेश बळीराम कोळंबकर यांचे ते वडील होत .त्यांच्या पश्चात एक मुलगी बहिणी , पुतण्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने तारकर्ली वरची वाडी ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केली. त्यांचे तारकर्ली स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)