चिंदर गावातील मुलांनी सुब्रमण्य केळकरांचा आदर्श बाळगावा : अरविंद बुवा पाताडे
पाताडे बुवांच्या हस्ते शैक्षणीक साहित्याचे वितरण.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथील प्रसिद्ध भजनी बुवा अरविंद पाताडे(बुवा) यांनी आज चिंदर येथील पूर्ण प्राथमिक शाळा, पालकरवाडी शाळा, भटवाडी शाळा तसेच सडेवाडी शाळा अशा विविध शाळांन मध्ये सतिश रघुनाथ सावंत यांच्या मार्फत देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.
पाताडे मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि मी सामाजिक बांधिलकी नेहमी जपतो. आपण शिक्षण घेतलेल्या शांळाचे ऋण फेडण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. गावातील शाळेतील मुलांनी अभ्यास करुन मोठे व्हा. सुब्रमण्य केळकर यांचा आदर्श नेहमी डोळ्या समोर ठेवा.
शैक्षणिक साहित्य वितरीत कार्यक्रमात स्वागत व समारोप अनुक्रमे चिंदर गावठणवाडी शाळा-मुख्याध्यापक करवडकर, पालकरवाडी शाळा नंदकुमार जुंढळे, भटवाडी शाळा-रतन बुटे, सडेवाडी शाळा -यशवंत पाटील यांनी मानले.
यावेळी चंद्रकांत पाताडे, श्रीकांत कानविंदे, सौ. मेश्राम, सौ. निशिगंधा वझे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)