धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजपासून ३० दिवस मोफत महाआरोग्य चिकित्सा शिबीर..
ह्रदय रोग व इतर तपासण्या होणार…
ठाणे महानगरपालिका , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम..
संतोष साळसकर | ब्यूरोचीफ : महाराष्ट्राचे आस्थास्थान व कै. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त , ठाणे महानगरपालिका, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी सलग ३० दिवस मोफत ई.सी.जी,२डी-इको, अँन्जीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाहित हृदयरोग संबंधी विविध मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
हे सलग ३० दिवसीय महाआरोग्य शिबीर आज शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०२२ ते दि.२६ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज सकाळी १० ते संध्या ५ वा या वेळेत धर्मवीर आनंद दिघे साहेब हार्ट केअर सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा,ठाणे येथे सुरू राहणार आहे.
तरी, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी ३० दिवस विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांनी केले आहे. वेळेअभावी नोंदणी न करू शकल्यास थेट शिबीर स्थळी केसपेपर काढून तपासणी करता येईल, अशी माहितीआयोजकांमार्फत देण्यात आली आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब हार्ट केअर सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा,ठाणे येथे होणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक जारी केले आहेत. ९९८७२२९९६०
माऊली धुळगंडे ८९०७७७६००२,
राम राऊत ८९०७७७६००४
सागर झाडे ८९०७७७६००६
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष* कार्यालय
०२२-२५३२२५६७/२५
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)