ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन ; मालवण सागरी महामार्गावरील खड्ड्यांबाबत भा.ज.यु.मो.आक्रमक..!

चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन ; मालवण सागरी महामार्गावरील खड्ड्यांबाबत भा.ज.यु.मो.आक्रमक..!

प्रकाशन: 26 Aug 2022 08:37 PM
वाचन संख्या 246

शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी दिला सा.बां.विभागाला इशारा…!

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातून जाणाऱ्या सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंबपूल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये धडक देत निवेदन देत सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याची पाहणी करण्यास भाग पाडले. गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी यावेळी दिला.

Article image

यावेळी ललित चव्हाण यांच्यासह महेंद्र पारकर, निनाद बादेकर आदी उपस्थित होते. देऊळवाडा ते कोळंब पूल या सागरी महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे अपघात घडत आहेत. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही लक्ष दिलेले नसून खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात घडल्यास त्याचे सा. बां. विभागास कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे, अशी टीका यावेळी ललित चव्हाण यांनी केली. सागरी महामार्गावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्यात यावेत तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ललित चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदारास दिला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गणेश चतुर्थी अगोदर देऊळवाडा ते कोळंब पूल या सागरी मार्गावरील रस्ते बुजविण्यात येतील, असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स