<em>मुंबई विद्यापीठाचे तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय (माॅडेल काॅलेज) इमारतीचे उद्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन..!</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
विद्यापीठाचे तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय (माॅडेल काॅलेज) च्या इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक २७ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयानजिक उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाची भव्य वास्तू अल्पावधीत उभारण्यात येऊन पूर्ण करण्यात आली आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठाचे हे एकमेव माॅडेल काॅलेज मंजूर होऊन सुरू झाले आहे.याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.
या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या सह प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री श्री.दीपक केसरकर तसेच प्रा.सुहास पेडणेकर कुलगुरु, विद्यापीठ, प्रा. रविंद्र कुलकर्णी कुलगुरू, विद्यापीठ, श्रीमती के. मंजुलक्ष्मी आ. प्र. से. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, डॉ. विनोद पाटील कुलसचिव (प्रभारी), विद्यापीठ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)