जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे नेत्रदान संकल्पाचे आवाहन..
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान साजरा होतोय नेत्रदान पंधरावडा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : रक्तदान व देहदान यांसोबत जनजागृती साठी अत्यावश्यक अशा नेत्रदानाविषयी केंद्र सरकारने अधिक ठोस कार्यक्रम जाहीर केला आहे.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टि क्षीणता कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी (25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ) राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो.
यावर्षी देखील 37 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करायाचा असून त्याचे घोषवाक्य ‘Let Your Eyes Live on’ * (आपले डोळे पिढ्यानपिढ्या जगत राहोत…) तुमचे डोळे जगू द्या असे आहे.
नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजू अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी आपल्या मृत्युनंतर दान करणे
नेत्रदानाचा अर्ज भरुन नेत्रदान करता येते. नेत्रदात्यास जेव्हा मृत्यू येईल. तेव्हा नातेवाईकांनी विलंब जवळच्या सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. डॉक्टर येण्यापूर्वी नेत्रदात्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन घ्यावे. मृतदेह ज्याठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावे खोलीत एसी असल्यास सुरु ठेवावा. जेणे करुन मृत व्यक्तीचे डोळे कोरडे पडणार नाही. तसेच डोळे बंद करुन डोळ्यावर ओले स्वच्छ कापड ठेवावे. नेत्रदानामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्यास विद्रुपता येत नाही. नेत्रदान हे कृत्य धर्मविरोधी नाही तसेच नेत्रहिनाला दृष्टी देण्यासारखे महान कार्य कोणतेही नाही.
लोकांनी समाजामध्ये नेत्रदानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)