ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>कुडाळ औद्योगिक विकास क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य शिबिर संपन्न..!</em>

<em>कुडाळ औद्योगिक विकास क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य शिबिर संपन्न..!</em>

प्रकाशन: 24 Aug 2022 10:01 PM
वाचन संख्या 52

बांदा | राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्था व कुडाळ एम .आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कुडाळ येथे वैद्यकीय शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

सर्वसामान्य कामगारांना जीवनाआवश्यक चाचण्या मोफत करून मिळाव्यात व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत व्हावी या दृष्टिकोनातून आज २३१ कर्मचाऱ्यांची मोफत रक्त तपासणी तसेच डोळे तपासणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचा उद्देश फक्त तपासण्या करण्याचा नसून तपासणीचे रिपोर्ट काढून त्यावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व चष्मा वाटप काही दिवसात करण्यात येणार आहे .

आज कुडाळ येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबच्या असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नीता गोवेकर यांच्या हस्ते झाले यावेळी कुडाळ एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष अमित वळंजू, रोटरी क्लब कुडाळचे सचिव दिनेश आजगावकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण केंद्राच्या केंद्र प्रमुख सौ. सुश्मिता नाईक, ग्लोबल फाउंडेशनचे लक्ष्मण देसाई, समुपदेशक मानसिंग पाटील, कोकण संस्थेचे समुपदेशक समीर शिर्के, अवंती गवस, प्रदीप पवार, कुणाल चव्हाण, अजय चव्हाण, प्रथमेश सावंत, बबलू परब, राणे यांनी मेहनत घेतली.

यावेळी रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष अमित वळंजू यांनीआरोग्य शिबिराचे महत्व आणि गरज याबाबत मार्गदर्शन केले तर कुडाळ एम. आय. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव ऍड. नकुल पार्सेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स