ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आसोली हायस्कूल समोरील पुलाच्या पुनर्बांधणी प्रश्नी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे लक्ष वेधणार ; भाजपा पदाधिकारी यांचे आसोली ग्रामस्थांना अभिवचन.

आसोली हायस्कूल समोरील पुलाच्या पुनर्बांधणी प्रश्नी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे लक्ष वेधणार ; भाजपा पदाधिकारी यांचे आसोली ग्रामस्थांना अभिवचन.

प्रकाशन: 24 Aug 2022 08:39 PM
वाचन संख्या 36

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला आसोली हायस्कूल समोरील पुल हा दिवसेंदिवस खचत चालला असुन, दरवर्षी त्या पुलाला मोठमोठे भगदाडे पडत आहेत. स्थानिक ग्रामस्थ दरवर्षी पडलेली भगदाडे काँक्रीटच्या सहाय्याने बुजवतात व वाहतूक सुरळीत करतात. परंतु बांधकाम विभागाकडे निधीची तरतूद नसल्याचे कारण देत दरवर्षी सदर कामाला निधी अभावी मंजुरी मिळत नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसात ग्रामस्थांबरोबर शाळेत शिकणार्या मुलांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

ह्यावर्षी सुध्दा सदर पुलाला मोठे भगदाड पडल्याने नियमित सुरू असलेली एस् टी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे २०० ते २५० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भगत यांना सोबत घेऊन त्या पुलाची पहाणी केली. तसेच लवकरात लवकर त्या पुलाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे बजेट मध्ये किंवा नाबार्ड योजनेमध्ये प्रस्तावित करावे असे सांगण्यात आले. तसेच सदर प्रश्नी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे लक्ष वेधून लवकरात लवकर या कामाला निधी मंजूर होण्यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे भाजपा शिष्टमंडळाने ग्रामस्थांना आश्वासीत केले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, परबवाडा सरपंच पपु परब, जेष्ठ नेते प्रकाश रेगे, माजी सरपंच व महिला मोर्चाच्या सुजाता देसाई, ग्रा.पं.सदस्य व युवा मोर्चाचे संकेत धुरी, आसोली सरपंच रीया कुडव, बुथप्रमुख गुरुनाथ घाडी, ग्रामस्थ आत्माराम घाडी, नारायण घाडी, आनंद धुरी, देवेंद्र धुरी, राकेश धुरी,संतोष चव्हाण, नंदा घाडी, विलास मेस्त्री इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स