मालवण नगरपरिषदेचे उत्सवपूर्व नियोजन.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरील सुरु केलेल्या दक्षता उपायांबद्दल मालवण नगरपरिषदेची होतेय प्रशंसा.
मालवण | सुयोग पंडित : यंदाच्या गणेशोत्सव सणाच्या पूर्वी, मालवण नगरपरिषद प्रशासनातर्फे मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम तसेच डास निर्मुलनासाठी औषध फवारणीची कामे प्रगती पथावर सुरु झाली आहेत.
तसेच शहर स्वच्छता व इतर तक्रारनिवारणासाठी मालवण नगर परिषदेची whatsapp हेल्पलाईनही कार्यरत करण्यात आली असून मालवणचे नागरिक 9405577431 या क्रमांकावर whatsapp द्वारे तसेच 1800-233-4381 या टोल फ्री नंबरवर फोन करू शकतात.
ही तक्रार नोंदणी करायची विशेष सोय देखिल नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रशासकीय अधिकारी वर्ग व कर्मचारी यांची या प्रयत्नांबद्दल मालवणच्या सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)