ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्गवासियांनो उद्योजक व्हा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्गवासियांनो उद्योजक व्हा

प्रकाशन: 29 Aug 2021 01:23 PM
वाचन संख्या 69

केंद्रीय उद्योगमंत्री राणेंचे आवाहन

कणकवली / उमेश परब – जनआशीर्वाद यात्रा ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांची आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. मागील १० दिवस मुंबईसह पूर्ण कोकणात जनतेचे आशीर्वाद घेत आहे. रात्री १ वाजेपर्यंत जनता जन आशीर्वाद यात्रेसाठी थांबलेले दिसून आले. रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद जनतेने मला दिला. उद्योजक बनवून दरडोई उत्पन वाढविणारे, देशाचा जीडीपी वाढवणारे माझ्याकडे केंद्रीय उद्योग खाते आहे. मला साथ देण्यासाठी सिंधुदुर्गवासियानो उद्योजक व्हा असे आवाहन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी विधनापरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि प अध्यक्षा संजना सावंत, राजन तेली उपस्थित होते. जनआशीर्वाद यात्रेत अपशकुन करत मांजर आडवे गेले. आधी स्वतःच्या मुलांचे गुण बघा. संजय राऊतमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. सामना आणि संजय राऊत ची प्रतिमा बौद्धिक लोकांमध्ये मलिन झाली आहे. माझ्या मुलांची बरोबरी करू नको. माझे दोन्ही मुलगे उच्चशिक्षित आहेत. माझ्यावर प्रेम करणारे माझे मुलगे असून माझ्या प्रतिमा जपण्याची काळजी ते घेत आहेत. राऊत तुमची लेखणी थांबवा अन्यथा आम्हीही आमचा प्रहार करू असा निर्वाणीचा इशारा केंद्रीयमंत्री राणे यांनी दिला. अनिल परब यांचा बुरखा शेवटी माध्यमानीच फाडला. पोलिसांना माझ्या अटकेचे आदेश जणू राष्ट्रपतीच्या आवेशात आदेश देत होता. माझ्यावर वाईट बोलल्याशिवाय सेनेत पद मिळत नाही. म्हणून माझ्यावर सेनेवाले टीका करतात. याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गातील खासदार अशी नामोल्लेख न करता विनायक राऊत यांच्यावर टीका केली. जेव्हा बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता. शरद पवार यांनी अज्ञातस्थळी जाण्यास सांगितले होते. आतंकवादी बाळासाहेबांच्या जीवावर उठले होते. बाळासाहेबांनी मला बोलावून संरक्षण देण्याची सूचना केली होती. मी माझी टीम घेऊन बाळासाहेबांना रात्रंदिवस जागून संरक्षण दिले. मातोश्रीबाहेर रात्रोरात्र जागून आम्ही पहारा दिला आहे. याची आठवण करून देत आता बस करा असा इशाराही राणे यांनी शिवसेनेला दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स