ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
……तर मनसैनिक नाक्यानाक्यावर गाड्या अडवतील ; मनसेचा जिल्हाप्रशासनाला इशारा

……तर मनसैनिक नाक्यानाक्यावर गाड्या अडवतील ; मनसेचा जिल्हाप्रशासनाला इशारा

प्रकाशन: 28 Aug 2021 04:08 PM
वाचन संख्या 43

वनविभागाची कारवाई हे मनसेच्या आंदोलनाचे ‘फलित’ : अमित इब्रामपूरकर

सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासुन अवैध वृक्षतोड करुन लाकूड वाहतूक करणाऱ्यांना मुद्देमालासहीत पकडून वनविभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहे हे मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे फलित आहे.परंतु वनविभागाची ही कारवाई किरकोळ स्वरुपाची असुन याहीपेक्षा मोठी कारवाई करावी अन्यथा जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते नाक्या-नाक्यावर थांबून अवैध लाकुड वाहतुक करत असलेल्या गाड्या अडवतील याला प्रशासन व वनविभाग जबाबदार असेल असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.पत्रकात पुढे ते म्हणतात मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली २३ आॕगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात अवैध वृक्षतोड थांबवावी,जिल्ह्यातील सर्व खाण प्रकल्प बंद व्हावेत,इंधन दरवाढ,अवैध मायनिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्‍यावर कारवाई करा व अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात मा.जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले होते.
देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणुनसिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव;पर्यटनजिल्हा म्हणून १९९९ साली शासनाने जाहीर केला.निसर्ग सौंदर्याने असलेल्या सिंधुदुर्गात अवैध वृक्षतोड गेले अनेक वर्षे सुरूच असून निवडून दिलेले जिल्ह्यातील मंत्री,लोकप्रतिनिधी या वृक्षतोडीबाबत मूग गिळून गप्प आहेत.मनसेने पर्यावरण दिनी आंदोलनाची हाक दिली होती.जिल्ह्यात पर्यावरणाची झालेली हानी पाहता वनविभागाने केलेली कारवाई किरकोळ स्वरुपाची आहे.याही पेक्षा मोठी कारवाई करावी.केवळ दोन,तीन ठिकाणी कारवाई करुन दिखावूपणा चालणार नाही.
अन्यथा जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते नाक्या-नाक्यावर थांबून अवैध लाकुड वाहतुक करत असलेल्या गाड्या थांबतील व मनसेच्या पद्धतीने कारवाई करतील.यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन व वनविभाग जबाबदार असेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 316

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स