ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>साळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा; सरपंच वैभव साळसकर यांचा सत्कार..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>साळशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा; सरपंच वैभव साळसकर यांचा सत्कार..!</em>

प्रकाशन: 21 Aug 2022 10:22 AM
वाचन संख्या 107

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर साळसकर यांची फेर बिनविरोध निवड..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायतीच्या १७ ऑगस्टच्या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली असून या सभेत या गावचे सरपंच वैभव साळसकर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम शासनाच्या आदेशाप्रमाणे योग्य नियोजन करून संबंधित घटकांना सामाविष्ट करून व सहकार्यातून तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी केला याबद्दल माजी सरपंच तथा माजी पं. स. सदस्य सुनील गावकर यांनी गावच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच उपसरपंच व सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.ही ग्रामसभा १७ ऑगस्टला सायंकाळी ३.३० वाजता माळवदे हाॅल येथे सरपंच वैभव साळसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. म. गांधी रोजगार हमी योजना आराखडा करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्ती ची फेररचना करण्यात आली असून अध्यक्ष प्रभाकर साळसकर यांची फेर बिनविरोध निवड करण्यात आली. विद्युत वितरण विभागाच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आदी गावाच्या विकासाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आला.

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी प्रभाकर साळसकर .

या सत्कार प्रसंगी सरपंच वैभव साळसकर यांनी गावाच्या विकासासाठी माझा कायम सहभाग असून सहकार्य असेल असे सांगितले.
या ग्रामसभेत सरपंच वैभव साळसकर ,उपसरपंच अनंत नाईक ,ग्रा प सदस्य, ग्रामसेवक मनिषा मांडे, पोलीस पाटील कामिनी नाईक ,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रा प कर्मचारी, बचतगटाचे सदस्य, वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्राम सभेला ११० ग्रामस्थ उपस्थित होते .ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स