ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग महिला कॅरम संघाला ऐतिहासिक कांस्य पदक..!

सिंधुदुर्ग महिला कॅरम संघाला ऐतिहासिक कांस्य पदक..!

प्रकाशन: 19 Aug 2022 10:19 AM
वाचन संख्या 68

मसुरे | प्रतिनिधी :
५६ वी महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद आणि आंतरजिल्हा स्पर्धा २०२२ – २३ दिनांक १३ ते १६ ऑगस्ट दरम्याने विरार येथे पार पडली. या स्पर्धेमधे महिला सांघिक गटामधे मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग असे ५ संघ सहभागी झाले होते. सिंधुदुर्गच्या पदक विजेत्या संघात केशर निर्गुण, सावंतवाडी (कर्णधार ), दिक्षा चव्हाण, कणकवली, प्रणिता आयरे व मयुरी गावडे, सावंतवाडी ह्या ४ ज्युनिअर गटातील मुली सहभागी झाल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंसह स्पर्धेत उतरलेल्या मुंबई आणि पुण्याच्या संघाविरुद्ध दुहेरीचा सामना सहज जिंकत मॅचमधे सनसनाटी निर्माण केल्यानंतर एकेरी सामन्यात तीन गेमपर्यंत कडवी झुंज दिल्यानंतर निसटत्या फरकाने सिंधुदुर्गने सामने गमावले. पालघर व ठाणे संघाविरुद्ध दुहेरी आणि एक एकेरी सामना जिंकत ऐतीहासिक कांस्य पदक पटकावले. संघ व्यवस्थापक म्हणून सावंतवाडीचे राजेश निर्गुण यांनी काम पाहिले.

सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या सध्याच्या कार्यकारिणीने अस्तित्वात आल्यापासून सर्वच स्तरावर उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. ज्युनिअर गटाचे राष्ट्रीय खेळाडू घडवल्यानंतर केशर निर्गुण या ज्युनिअर गरातील खेळाडूने २०२१ मधे वरिष्ठ राज्यस्तरीय निवड चाचणी जिंकून जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. तर सुमारे २० वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाला अजिंक्यपद मिळवून देताना उपउपान्त्य व अंतिम सामन्यात एकेरी गटाचा सामना जिंकत मोलाची कामगिरी बजावली. तसेच या राष्ट्रीय स्पर्धेत कणकवलीची दिक्षा चव्हाण देखील महाराष्ट्राकडून सहभागी झाली होती.

त्यामुळे या राज्य स्तरावरील सांघिक कांस्य पदकामुळे जिल्ह्यातील कॅरम प्रेमींमधे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. विविध स्तरातून या विजेत्या महिला संघावर व जिल्हा संघटनेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स