ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>आजगाव साहित्य कट्ट्याची बाविसावी सभा रविवार दिनांक २१ ऑगस्टला…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>आजगाव साहित्य कट्ट्याची बाविसावी सभा रविवार दिनांक २१ ऑगस्टला…!</em>

प्रकाशन: 18 Aug 2022 06:41 PM
वाचन संख्या 89

चिंदर | विवेक परब :
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची बाविसावी मासिक सभा रविवार दिनांक २१ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे.

या सभेत ‘काव्यभोवताल’ या कार्यक्रमा अंतर्गत कवी विनय सौदागर त्यांच्या मालवणी कवितेच्या प्रवासा बद्दल बोलतील.विनय सौदागर यांचे ‘भोवताल’ व ‘सभोवताल’ हे दोन मालवणी काव्यसंग्रह प्रकाशित असून या कार्यक्रमात त्यातील काही कविता ते सादर करतील; तसेच या कवितांचा प्रवासही उलगडून दाखवतील. त्यांनी सुमारे पाचशे मालवणी चारोळ्या लिहिल्या असून त्यापैकी तीनशे चारोळ्या स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याविषयी,तसेच मालवणी हायकू (मायकू) विषयीही ते बोलतील.

तरी याचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्याविषयी चर्चा करणेसाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स