<em>शिवसेना नेत्यांचा उद्या वैभववाडी दौरा..!</em>
भुईबावडा, कोकिसरे, लोरे जि.प. विभागात बैठकांचे आयोजन…!
कणकवली | प्रतिनिधी :
शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील जिल्हापरिषद मतदारसंघामध्ये विभागीय बैठका उद्या शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
दुपारी ३ वाजता भुईबावडा जि. प. विभागाची बैठक रमाकांत मोरे ( गावठाण) यांच्या घरी होणार आहे. सायंकाळी ५ वाजता कोकिसरे जि. प. विभागाची बैठक वैभववाडी आंबेडकर भवन येथे होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता लोरे जि.प. विभागाची बैठक मांजलकरवाडी येथील विलास नावळे यांच्या घरी होणार आहे.
या बैठकीला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर,अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे आदी शिवसेना नेत्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी बैठकांना त्या त्या विभागातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, व युवासेना तालुकाप्रमुख अतुल सरवटे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)