<em>सामाजिक कार्यकर्ते मिठबांव सरपंच भाई नरे यांचा कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसिलदार रमेश पवार यांच्या हस्ते सत्कार…!</em>
चिंदर | विवेक परब :
Human Rights Association (मानव अधिकार संरक्षण संघटना सिंधुदुर्ग)तर्फे १५ ऑगस्ट २०२२ राेजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तहसीलदार कार्यालय कणकवली येथे प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने व तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते मिठबांव सरपंच भाई नरे यांचा सत्कार करण्यात आला.
ह्युमन राईट असोशियन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा अध्यक्ष मनोज तोरसकर, कणकवली अध्यक्ष हनिफ पिरखान, सचिव मनोज वारे, जनसंपर्क अधिकारी प्रविण गायकवाड, संघटक दादा कोरडे, सदस्य साईनाथ गोसावी, गितांजली कामत, भूषण शेटे, संजय मालंडकर, नायब तहसीलदार राठोड, नायब तहसिलदार रासम इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिनेकलाकार अभय खडपकर यांनी केले .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)