ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नागेश मोरये यांचे सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच…!

नागेश मोरये यांचे सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच…!

प्रकाशन: 16 Aug 2022 08:30 PM
वाचन संख्या 48

कणकवली I प्रतिनिधी : महामार्ग चौपदरीकरणांतर्गत विशेषतः नांदगांव परिसरात कित्येक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार लक्ष वेधूनही महामार्ग प्राधिकरण या समस्या सोडविण्याबाबत दुर्लक्ष करत असल्‍याच्या निषेधार्थ जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी सभापती नागेश मोरये यांनी १५ ऑगस्ट पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. श्री.मोरये यांनी यापूर्वी २५ जुलै रोजी याच मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. त्‍यावेळी आठ दिवसांत प्रश्‍न सोडविण्याची ग्‍वाही महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. प्रत्‍यक्षात काहीही कार्यवाही न झाल्‍याने श्री.मोरये यांनी १५ ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणाला प्रारंभ केला आहे. मोरये म्हणाले, महामार्गाचे चौपदरीकरण गरजेचेच होते. मात्र, चौपदरीकरणांतर्गत नांदगाव परिसरातील अनेक कामे अपूर्ण ठेवलेली आहेत. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे. चौपदरीकरणात तांत्रिक बाबी विचारात घेतलेल्या नाहीत, याचा मोठा फटका आम्हा ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. काहीजण तर हायवेमध्ये गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यापासूनही वंचित आहेत. अशा कित्येक मुद्द्यांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. तरीही संबंधित विभागांकडून कार्यवाही सोडाच, समाधानकारक उत्तरेही मिळत नाहीत. म्हणूनच मी आमरण उपोषणास बसलो आहे. या उपोषणाला नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, भाई मोरजकर, पत्रकार भगवान लोके, सुभाष बिडये, मारुती मोरये, संतोष बिडये, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, विजय म्हाडेश्वर आदींसह ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स