कासार्डे उपकेंद्र साटमवाडी येथे ७५ वा अमृतमहोत्सव साजरा..!
वृक्षारोपण व किशोरवयीन मेळाव्याचे विशेष आयोजन ; आरोग्य सेवक भालचंद्र साळुंखे यांची माहिती.
जेष्ठनागरिकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला….!
कणकवली I प्रतिनिधी : देशात सर्वत्र देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या काळात बरेच सामाजिक कार्यक्रम देखील घेण्यात आले. सिंधुदुर्गात देखील अनेक सामाजिक, लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.
यात, तालुक्यातील कासार्डे उपकेंद्र साटमवाडी येथे सामाजिक कार्यक्रम तसेच वृक्षारोपण, किशोरवयीन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याबाबतची माहिती आरोग्यसेवक भालचंद्र साळुंखे यांनी दिली.
यावेळी बी. एन.साळुंखे आरोग्य सेवक, दर्शना धुरे आरोग्यसेविका तसेच आशा स्वयंसेविका, उपस्थित होते. आरोग्य सेवक साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)