ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
युवा पिढीला जेष्ठांनी दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद - सुरेश ठाकूर .
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

युवा पिढीला जेष्ठांनी दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद - सुरेश ठाकूर .

प्रकाशन: 16 Aug 2022 01:02 PM
वाचन संख्या 42

हडी जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने ५० गुणवंतांचा सत्कार..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
हडी गावातील जेष्ठ नागरिक संघाने गावातील भावी पिढीला दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद आहे. जीवनात वेळेला महत्व ध्या.जेष्ठ ग्रामस्थांनी चिंता सोडून मन नेहमी प्रफुल्लित आणि आरोग्य निरोगी ठेवावे. गुणवंत विद्यार्थ्यांनी कर्तव्याची जाणीव ठेवून गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन साने गुरुजी कथामाला मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी हडी येथे केले.

फेसकॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, शालेय परीक्षेतील ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव हडी शाळा सभागृहात करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, माजी सभापती उदय परब, माजी सरपंच प्रकाश तोंडवळकर,सौ. श्रुती गोगटे, सोनाली कदम, दिलीप करंदीकर, पुजा तोंडवळकर, दिनेश सुर्वे सुरेश भोजणे, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव रमाकांत सुर्वे,
लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरेश ठाकूर यांनी मराठी भाषेतील म्हणी व वाक्प्रचार याबाबत संदर्भासह माहिती यावेळी दिली. उदय परब म्हणाले, हडी जेष्ठ नागरिक संघाचे कार्य, विविध उपक्रम कौतुकास्पद असतात. माजी सचिव चंद्रकांत पाटकर यांचे संघासाठी मोलाचे योगदान लाभत आहे. संघाने अशाच प्रकारे पुढील काळात कार्यक्रम राबवावे.साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या बद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

चंद्रकांत पाटकर यांनी प्रास्ताविकात जास्तीत जास्त जेष्ठ ग्रामस्थांनी संघाचे सदस्य होऊन संघ आणखी बळकट करूया असे आवाहन केले. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सदस्य प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर,
रमेश कावले, गणु परब,श्रीधर परब, रामदास पेडणेकर गणेश परब, सौ मनिषा पोयरेकर सौ प्रज्ञा तोंडवळकर, सौ. वनिता हडकर, यशवंत शेट्ये, देऊ भोजने, आरोग्यसेविका सौ.वाघ आदी उपस्थित होते. आभार संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स