ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त पोयरेत विविध स्पर्धा..!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त पोयरेत विविध स्पर्धा..!

प्रकाशन: 15 Aug 2022 07:42 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पोयरेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धा संपन्न झाल्या. ९ ऑगस्टला प्रभातफेरी, सामूहिक प्रार्थना,ऑगस्ट क्रांतिदिनाचे महत्व,भाषणे आदी कार्यक्रम झाले.
१० ऑगस्टला ग्रामपंचायत आवारात सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. पोयरे गावातील सर्व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आदी स्पर्धा घेऊन प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाना बक्षिसे देण्यात आली.

पोयरे गावातील महिला व माता-भगिनीसाठी स्पर्धा घेण्यात आल्या.त्यात एका काडीत जास्तीत जास्त मेणबत्या पेटविणे,संगीत खुर्ची,चमचा गोटी आदी स्पर्धा घेऊन बक्षिसे देण्यात आली. या प्रसंगी सरपंच सौ.समिक्षा घाडी,उपसरपंच श्री रमेश राणे,ग्रामसेवक श्री कुबल, माजी सरपंच श्री संदिप घाडी,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,पो. पाटील संतोष केसरकर आदिसह सर्व स्पर्धासाठी पोयरे ग्रामस्थ, नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स