<em>राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला..!</em>
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा- http://localhost/news/public/uploads/2022 ही रविवार दिनांक 21 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2022 रोजी होणार आहे.
कणकवली येथील विद्यामंदिर माध्यामिक प्रशाला आणि कणकवली कॉलेज या दोन केंद्रावर ही परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षंची वेळ सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 अशी असून परीक्षेस एकुण 602 परीक्षार्थी प्रविष्ठ होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली.
परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवली KD001001 ते KD001432 व कणकवली कॉलेज कणकवली, (जुनी इमारत) KD002001 ते KD002170 या 2 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे.
अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.
परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.
परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे.
उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा, अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे.आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक,भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी स्वत:पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनी कळविले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)