ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
<em>बाळासाहेब,उद्धवजी ठाकरे नसते तर माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला नसता - आ. वैभव नाईक.</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>बाळासाहेब,उद्धवजी ठाकरे नसते तर माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला नसता - आ. वैभव नाईक.</em>

प्रकाशन: 10 Aug 2022 05:47 PM
वाचन संख्या 73

कळसुली, जानवली, कलमठ जि. प. मतदारसंघाच्या बैठका संपन्न..!

कळसुली विभागप्रमुख पदी चंदू परब , जानवली विभागप्रमुख पदी सुदाम तेली.

कणकवली | प्रतिनिधी :
शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे यांनी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना विविध पदे बहाल केली. मात्र काहींनी आता त्यांचा विश्वासघात केला. बाळासाहेब, उद्धवजी ठाकरे नसते तर माझ्यासारखा कार्यकर्ता कधी आमदार झाला नसता. आता आमदार खासदार शिवसेनेतून फुटून गेले असले तरी शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता उद्धवजींच्या पाठीशी आहे. सत्तेसाठी भाजप लोकशाहीची हत्या करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबला आहे. जिल्ह्यात आपली लढाई हि राणेंविरुद्ध आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला विजय हवा आहे. असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळसुली जि. प. विभागाची बैठक ओसरगाव गवळवाडी येथील सदा मोरे यांच्या घरी तसेच , जानवली विभागाची बैठक जानवली ,सखलवाडी येथील सत्यवान राणे यांच्या घरी व कलमठ विभागाची बैठक कलमठ येथील विलास गुडेकर यांच्या घरी काल मंगळवारी संपन्न झाली. याप्रसंगी कळसुली जि. प. विभागप्रमुख पदी चंदू परब, ओसरगाव उपविभागप्रमुख पदी शरद साळवी, कळसुली उपविभागप्रमुख पदी रवी सावंत, जानवली जि. प. विभागप्रमुख पदी सुदाम तेली यांची निवड करण्यात आली.

शिवसेनेचे आमदार, खासदार फोडून शिवसेना कमकुवत करणे हे भाजपचे षडयंत्र आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे. या पापात शिंदे गट सहभागी झाला आहे. मात्र शिवसेनेची संघटना आणखी मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हापरिषद हि एका कुटूंबाकडे आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बदल घडवून जि. प. वर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. शिवसैनिक आणि सिंधुदुर्गची जनताच परिवर्तन करू शकते हे आमदार वैभव नाईक यांना निवडून देऊन कुडाळ मालवण वासियांनी दाखवून दिले आहे. नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणे या गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे. जनतेशी संपर्क कसा ठेवायचा हे आमदार वैभव नाईक यांच्याकडून शिकले पाहिजे असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.

इतर आमदारांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असली तरी आ. वैभव नाईक यांनी निष्ठा जपली आहे. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. गावागावात जाऊन शिवसेना संघटना वाढीसाठी मेहनत घ्या. सभासद नोंदणीवर भर द्या. असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.

यावेळी ओसरगाव येथे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख राजू राणे, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, ऍड हर्षद गावडे, सुशांत दळवी, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, प्रमोद सावंत, रवी सावंत, सदा मोरे, निलेश सावंत, संतोष गुरव, उमेश गुरव, विलास सावंत, शिरीष घाडीगावकर, शरद सरंगले, पांडु कारेकर, उदय सावंत, महेश वारंग, उत्तम राणे, नंदू गावडे, सुभाष परब, सहदेव नाईक, विष्णू ठाकूर, विकास गुरव, नंदकिशोर परब, आदित्य मोरे, दशरथ शिंदे आदी.

जानवली येथे उपतालुकाप्रमुख महेश कोदे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, शशिकांत गुरव, हुमरठ सरपंच दिलीप मर्ये, जानवली विभागप्रमुख सुदाम तेली, अरविंद राणे, सत्यवान राणे, भालचंद्र दळवी, सागर गवाणकर, व्यंकटेश वारंग, निखिल साटम, पांडुरंग मेस्त्री, बाबू घाडी, दादा भोगले, अमोल राणे आदी
कलमठ येथे उद्योजक रामू विखाळे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, विभागप्रमुख अनुप वारंग,कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड, बाळू मेस्त्री, विनायक सावंत, विलास गुडेकर, विनय हडकर, अनंत कदम, एजास शेख, राजू कोरगावकर, संदीप कांबळी, सुहास राणे, अर्चना कोरगावकर, स्वरा कांबळी, पंकज चिंदरकर आदींसह शिवसैनिक मोठया सख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स