सुगंधीत मेणबत्त्यांचे मुंबई येथे प्रदर्शन..!!
मसूरे येथील कु. भावना प्रदीप भोगले या काॅलेज कुमारीकेचा अभिनव उपक्रम..!!
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे देऊळवाडा मठ येथील भावना प्रदीप भोगले एस .एम शेट्टी कॉलेज पवई टी .वाय .बी .कॉम च्या वर्गात शिकत असलेल्या कॉलेज कन्येने मुंबई येथे सुगंधित मेणबत्ती बनविण्याच्या उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले असून नुकतेच याचे एक प्रदर्शन मुंबई येथे मांडण्यात आले होते तिच्या या विविध रंगातील आणि विविध आकारातील सुगंधित मेणबत त्यांच्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला होता काहीतरी नवीन करावे या उद्देशाने कॉलेजचे शिक्षण घेत असताना भावना तिच्या मनामध्ये सुगंधित आकर्षक मेणबत्त्या बनविण्याचे आले आणि तिनेही कल्पना सत्यात उतरवली मुंबई येथे तिने विविध रंगातील आणि विविध आकारातील सुगंधित मेणबत्ती बनवण्यास सुरुवात केली तिच्या या आकर्षक अशा सुगंधित मेणबत त्यांना मुंबईमध्ये हॉटेल्स विविध मॉल मंदिरे चर्च बर्थडे पार्टी अशा विविध ठिकाणी मागणी वाढली आहे. रोजगाराची एक नवीन संधी तिने कॉलेज युवक युवतींसाठी निर्माण केली आहे. देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोगले यांचे भावना ही कन्या आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)