ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>सरस्वती विद्यामंदिर कुवळे नं. १ शाळेचा सैनिकांसाठी रक्षाबंधनाचा उपक्रम..!</em>

<em>सरस्वती विद्यामंदिर कुवळे नं. १ शाळेचा सैनिकांसाठी रक्षाबंधनाचा उपक्रम..!</em>

प्रकाशन: 10 Aug 2022 02:43 PM
वाचन संख्या 299

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :

रक्षाबंधनाचा सण दर वर्षी येतो. परंतु जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना मात्र आपल्या कुटुंबीयांबरोबर हा सण साजरा करता येत नाही. सदैव २४ तास सीमेवर पहारा करणाऱ्या देश बांधवांना रक्षाबंधना सारख्या बहीण – भावाच्या पवित्र सणामध्ये सहभागी करून या सणाला राष्ट्रीय सणाचे रूप देण्यासाठी तसेच बहिण भावाच्या नात्यातील बंद दृढ करण्यासाठी देवगड तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर कुवळे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवला आहे.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवून कलेची जोपासना करत ९८ राख्या पोस्टाद्वारे सैनिकांना पाठवल्या आहेत. सैनिकांच्या मनामध्ये आपल्या बहिणी बद्दलच्या पवित्र भावना जपत तिचे सदैव रक्षण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू परब, उपशिक्षक वसंत शेटये, शंकर भुजबळ, जयवंत कुंभार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स