ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,शिरगांवच्या मुलांचा अमृतमहोत्सव 'स्वराज्य  महोत्सव' अंतर्गत विविध स्पर्धेत नेत्रदीपक यश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,शिरगांवच्या मुलांचा अमृतमहोत्सव 'स्वराज्य महोत्सव' अंतर्गत विविध स्पर्धेत नेत्रदीपक यश..!

प्रकाशन: 08 Aug 2022 03:14 PM
वाचन संख्या 49

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, ‘ स्वराज्य महोत्सव ‘ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगांव ने घवघवीत यश संपादन केले.

चित्रकला स्पर्धा गट ११ वी ते १२वी द्वितीय क्रमांक – प्रसाद सुहास कदम
वक्तृत्व स्पर्धा : गट ११ वी ते १२वी तृतीय क्रमांक – रिया सुनिल मेस्त्री
निबंध स्पर्धा : गट ०८ वी ते १०वी द्वितीय क्रमांक – सुकन्या विजय साटम चित्रकला व निबंध स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

कु. प्रसाद सुहास कदम.
कु. रिया सुनिल मेस्त्री.
कु. सुकन्या विजय साटम .

मार्गदर्शक शिक्षक – विनोद चौगुले संतोष शिरवडकर, सौ. सरस्वती धुरी, या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले, शाळा समिती चेअरमन राजन चव्हाण, संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक शमशुद्दीन अत्तार , पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे ,पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स