ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>देवगड तालुकास्तरिय निबंध स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या मानसी लाड हिचे दैदिप्यमान यश.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>देवगड तालुकास्तरिय निबंध स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या मानसी लाड हिचे दैदिप्यमान यश.</em>

प्रकाशन: 06 Aug 2022 09:58 PM
वाचन संख्या 171

शिरगांव | संतोष साळसकर :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देवगड पोलीस स्टेशन ने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला असून या स्पर्धेत आठवी ते दहावी या गटात- माध्यमिक विद्यामंदिर साळशी,ता.देवगड ची विद्यार्थिनी कुमारी मानसी अजय लाड , इयत्ता १० वी ,हिने तालुकास्तरिय या स्पर्धेत निबंध लेखनात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाबाबत देवगड पोलीस स्टेशन कडून स्पर्धकांना लवकरच कळविण्यात येईल. सर्व विजेत्या स्पर्धकांचे देवगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक निळकंठ बगळे साहेब- देवगड, माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे मुख्याध्यापक माणिक वंजारे, स्कूल कमिटी चे चेअरमन सत्यवान सावंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ व पालक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादिंनी प्रथम क्रमांक प्राप्त मानसी लाड हिचे व मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम साटम या दोघांचे हार्दिक अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स