तारकर्ली येथे ई पीक पाहणी आणि मार्गदर्शन कॅम्पचे आयोजन..!
तारकर्ली | प्रतिनिधी :
तारकर्ली येथे दिनांक ६/८/२०२२ ला सकाळी ग्रामपंचायत तारकर्ली कार्यालयात मा.तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली तारकर्लीचे तलाठी मा. विजय पास्ते यांनी तारकर्ली ग्रामस्थ यांना मोबाईल द्वारे ॲप घेऊन आपली जागा त्यातील जागेत कोणती झाडे ,कोणती शेती आहेत ती माहिती खाते नंबर टाकून कशाप्रकारे भरायची याबाबत माहिती दिली.
आपल्या जागेत मग ती कितीही जागा असो कोणतीही झाडांची बाग किंवा शेती असली तरी नमूद हे केलेच पाहिजे .नमूद असल्याने भविष्यात आपल कोणतीही नुकसान झाल्यास आपणास ती झालेली नुकसान भरपाई न चुकता मिळणार याकरिता सरकारनी ही महत्वाची माहिती ॲपच्या द्वारे भरण्याचे आदेश काढले .यामुळे आपली कोणत्याही प्रकारची नुकसान झाल्यास पंचनामे करतेवेळी अडचण येणार नाही.जी झालेली नुकसान व्यवस्थित मिळणार.यावेळी तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे व त्यांचे सहकारी सिरपुटे यांचे गावाच्या वतीने आभार मानले आणि तलाठी पास्ते यांना आपण अशीच माहिती आपण तारकर्ली ला पुन्हा स्किईंच्या माध्यमातून घ्या तरच ग्रामस्थांना समजेल ते त्यांनी मान्य केले.यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ महिला वर्ग तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)