ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
तळाशील-तोंडवली धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाची आम. वैभव नाईक यांनी केली पाहणी

तळाशील-तोंडवली धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाची आम. वैभव नाईक यांनी केली पाहणी

प्रकाशन: 26 Aug 2021 07:27 PM
वाचन संख्या 95

लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

मालवण | वैभव माणगावकर : तळाशील तोंडवली समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरु असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. मोठं मोठे दगड वापरून बंधाऱ्याचे चांगल्या दर्जाचे काम केले जात असून आमदार वैभव नाईक यांनी समाधान व्यक्त केले. तसेच काम लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर कायमस्वरुपी बंधारा होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

            आ. वैभव नाईक यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तळाशील गावात  ५४ लाखाचे  दोन धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करून घेतले आहेत. तळाशील गावात बंधारा बांधण्याचा  दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण  करत  बंधाऱ्याचे काम मागील आठवड्यात सुरु करण्यात आले आहे. हे काम प्रगतीपथावर असून कामाची आ.वैभव नाईक यांनी आज पाहणी केली.  
       याप्रसंगी मालवण शिवसेना  तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,  सरपंच आबा कांदळकर,राजू परब, गजा  तारी, संजय केळुसकर, धर्माजी रेवंडकर, संतोष कांदळगावकर, विवेक रेवंडकर, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स