देवगड येथे प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन...!
शिरगांव | संतोष साळसकर :
तालुका कृषी अधिकारी श्री ढेपे ,कृषी पर्यवेक्षक श्री आपटे , कृषी सहाय्यक श्री राठोड ,श्री सदावर्ते ,श्री सोनार ,श्री बाठे यांनी उपस्थित राहून प्रचार प्रसिध्दी गाडी सोबत पीक विमा तालुका प्रतिनधी देवगड मयुर सावंत यांचे सोबत गावागावांत जाऊन पीक विमा भरणे संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळेस पीक विमा का भरावा आणि त्याचे फायदे काय याबद्दल तालुका कृषी अधिकारी श्री ढेपे आणि पीक विमा देवगड तालुका समन्वयक मयुर सावंत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले..
यावेळेस गावागावांत तसे थेट बांधावर जाऊन देखील मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची यावेळेस उत्तरे देण्यात आली यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. .
देवगड तालुका कृषी अधिकारी श्री ढेपे साहेब सर्व तालुका कृषी टीम आणि देवगड तालुका पीक विमा अधिकारी मयुर सावंत हे तालुक्यामध्ये थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)