ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत.</em>

प्रकाशन: 31 Jul 2022 04:49 PM
वाचन संख्या 55

शिरगांव | संतोष साळसकर :
शेठ म.ग. हायस्कूलच्या १९९८ – ९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व वह्यांची मदत करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थिनी शीतल वैशंपायन व स्वाती पाटणकर या उपस्थित होत्या.
१९९८ – ९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून त्यांनी आपल्या वर्ग मित्रांच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. ही दहावीची बॅच गेली दोन वर्षे सातत्याने शाळेशी संपर्क साधून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या लक्षात घेऊन सातत्याने ही मदत करीत आहेत. शाळेविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांनी राबवलेला हा स्तुत्य उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे विचार मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी यावेळी मांडले. याप्रसंगी पर्यवेक्षक तानाजी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या या देणगी बद्दल या माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स