ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
स्वयं दीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणचे कार्य जिल्ह्याला आदर्श व्रत -भगवान जाधव.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्वयं दीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणचे कार्य जिल्ह्याला आदर्श व्रत -भगवान जाधव.

प्रकाशन: 31 Jul 2022 04:56 PM
वाचन संख्या 68

मसुरे | प्रतिनिधी :
स्वयं दीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवण यांनी मालवण तालुक्यामध्ये गावागावातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून एक प्रकारची क्रांती घडविली आहे. स्वयं दीप प्रतिष्ठानचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्याला आदर्श व्रत असा आहे असे मत स्वयं दीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी मसुरे येथे बोलताना केले.
स्वयं दीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवण च्या वतीने मालवण तालुक्यातील गरजू विद्यार्थी आणि दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम मसुरे येथे भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण म्हणाले आज विद्यार्थ्यांच्या पाठीवरती या प्रतिष्ठानने जी कौतुकाची थाप मारलेली आहे यातून या प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी अनेक शाळा, सामाजिक संस्था, होतकरू विद्यार्थी यांना शैक्षणिक आर्थिक सहकार्य केले आहे हे सुद्धा या जिल्ह्याला भूषण वाह आहे. गुणवंत सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून मिळालेल्या संधीचे सोने करायला शिका असे सांगितले. या वेळी व्यासपीठावरती मंडळ अधिकारी श्री सुहास चव्हाण, कोडीव्य पवार, शरद मोरे, नारायण पांचाळ, प्रीतम जाधव, राजेंद्र जाधव, गुरुदास जाधव, मिलिंद जाधव, दिक्षिता वराडकर, शैलेश मसुरकर, संतोष तांबे, रुपेश तांबे, प्रवीण सावंत, अर्पिता तोंडवळकर, खूषी परब, लौकिक भोगले, शुभम पाटील, श्रावणी मोरे, योजना मोरे, गणेश पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कोडीव्य पवार आणि आभार शरद मोरे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स