'बांदीवडे' तील 'मिरी लागवडीची रायगडच्या शेतकऱ्यांन कडून पाहणी..!
मिलिंद प्रभुनी दिली शास्वत उत्पन्नाच्या काळीमिरी प्रकल्पाची माहिती.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साई गावातील साई शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी मिलिंद प्रभुंच्या बांदिवडे येथील काळीमिरी प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त व शाश्वत उत्पन्न कसे मिळवता येते याची माहिती जाणून घेतली.
सिंधुदुर्गात आलेल्या रायगड वासियांच्या या शेती अभ्यास दौर्यामध्ये कोकणातील प्रगतशील शेतकरी आणि त्यांनी यशस्वी पणे राबविलेले शेती प्रकल्प यांना भेटी देऊन या अभ्यासू व निष्ठावान शेतकर्यांनी आपला दौरा यशस्वी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे येथे भेटीदरम्यान काळी मिरीचे व्यवसायीक महत्व, लागवडीसाठी आवश्यक पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन व औषध व्यवस्थापन तसेच जमीनीची प्रत, मशागत, लागवड प्रमाण, संवर्धन,काढणी, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन अशा विविध विषयांवर अमेरिका दौऱ्यावर असलेले प्रकल्प प्रणेते मिलिंद प्रभु यांनी ह्या शेतकर्यांना अर्धा तास दुरदृष्य प्रणालीद्वारे सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना दिलेला वेळ आणि केलेले मार्गदर्शन यामुळे रायगडचे शेतकरी आनंदित झाले. अतिशय नियोजनबद्द,निसर्गाचा समतोल राखून तसेच शाश्वत उत्पन्नाची हमी देणारा काळीमीरी प्रकल्प पाहून निश्चितच शेतकऱ्यांना प्रेरणा व उमेद मिळाली.
सदर शेती दौऱ्या दरम्यान साई शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रशांत अधिकारी तसेच अरुण कुंभार, गफूर राहटविलकर, मुबीन कोंडविलकर,मौलाना कासीम सोलकर, मौलाना रिझवान जालगावकर, नरेश अधीकारी आदी शेतकरी बांदिवडे पॅटर्न ओळखला जाणारा “सागावर काळीमीरी” ह्या नाविन्यपुर्ण प्रकल्पाविषयी अभ्यासपुर्ण माहिती घेण्याकरिता उपस्थित होते. यावेळी उमेश परब, दाजी हिर्लेकर, भुषण परब, जयश्री त्रिंबककर,सरीता त्रिंबककर, गणेश चव्हाण यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर दौरा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मिलिंद प्रभु ह्यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)