ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>ग्रामीण रुग्णालय मालवण येथे १३ ऑगस्टला ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिराचे आयोजन..!</em>

<em>ग्रामीण रुग्णालय मालवण येथे १३ ऑगस्टला ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिराचे आयोजन..!</em>

प्रकाशन: 27 Jul 2022 11:21 AM
वाचन संख्या 43

शिरगांव / संतोष साळसकर :
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या वतीने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडआणि त्यांचा कॅन्सर केअर विभाग व सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय मालवण येथे दिनांक १३ ऑगस्टला दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत”ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामधे कर्करोगाचे तज्ञ डॉक्टर स्तनाचा कर्करोग असलेल्या रूग्णांची तसेच नवीन संशयित स्तनाच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी करून केमोथेरपी / रेडिओथेरपी इत्यादी उपचार व शस्त्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन करतील. KIMS कॅन्सर टीम अंतर्गत पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्ध स्तन कर्करोग तज्ञ सर्जन प्रा. डॉ. सुरेशजी भोसले
(KIMS कराड) रुग्णांना सल्ला देतील आणि मार्गदर्शन करतील. आपल्या गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा हि आमची प्रामाणिक इच्छा आहे.यासाठी कृपया आपल्या रुग्णांना या शिबिराची माहिती देवून शिबिराचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. शक्य असल्यास या रुग्णांची यादी आम्हाला पाठवा. आम्ही त्यांना व्यक्तिशः संपर्क करू.
शिबिरातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार या अनुषंगाने रुग्णांना पुढील निर्णयासाठी तुमच्याकडे परत पाठविण्यात येईल. कृपया या रुग्णांची नोंदणी करा आणि गरीब आणि गरजू स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करा. येथून मालवण साठी गाडीची व्यवस्था करण्यात येईल.तरी नोंदणीसाठी संपर्क- डॉ. रामचंद्र चव्हाण ९४२३३०२७२०,रेडकर हॉस्पिटल मालवण ०२३६५-२५२११५,७५८८५४४७०० डॉ. केतकी जामसंडेकर यांच्याशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स