ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रत्नागिरी-कुणकेश्वर बसफेरी २८ जुलै पासून नियमित सुरु होणार..!

रत्नागिरी-कुणकेश्वर बसफेरी २८ जुलै पासून नियमित सुरु होणार..!

प्रकाशन: 26 Jul 2022 11:06 PM
वाचन संख्या 28

शिरगांव / संतोष साळसकर :
रत्नागिरी राज्य परिवहन मंडळ विभाग मार्फत रत्नागिरी पावस नाटळ मार्गे पटेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड या सागरी मार्गावरुन सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी रत्नागिरी कुणकेश्वर ही प्रवासी फेरी गुरुवार दिनांक २८ जुलै २०२२ पासून कायमस्वरुपी सुरु करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली.
ही प्रवासी फेरी सुरू करण्याकरीता देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांनी विशेष प्रयत्न केले होते. सदर प्रवासी फेरी देवगड बस स्थानकावर १०.३० वाजता पोहोचणार असून कुणकेश्वर येथे ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरता सदर फेरी दुपारी २.३० वाजता कुणकेश्वर येथून व देवगड येथून ३.०० वा वाजता पडेल जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी कडे रवाना होणार आहे तरी या प्रवासी फेरीचा फायदा प्रवाशानी घ्यावा असे आवाहन रत्नागिरी रापन विभाग च्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स